BIG BREAKING : बारामती तहसिल कार्यालयात उशिरा येणाऱ्या १० कर्मचाऱ्यांना नोटीस;२४ तासात खुलासा सादर करण्याचे तहसीलदारांनी दिले आदेश…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीचा विकास व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणत असतात आणि अनेक इमारती बांधून, बारामतीच्या वैभवात भर टाकत असतात. मात्र याच शासकीय इमारतीत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना याचे भानच राहत नाही की काय ? असे म्हणटले तरी वावगे ठरणार नाही.कारण बारामती तहसील कार्यालयामध्ये शासकीय कामकाज वेळ होऊनही कर्मचारी हजर नसतात.शासनाने कार्यालयीन वेळ ठरवुन दिलेली असताना कर्मचारी मात्र वेळ पाळताना दिसत नाहीत.त्यामुळे जनतेची मात्र तारांबळ होताना दिसते दिसते अशी तक्रार ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष युवराज पोटे यांनी दिली..

युवराज पोटे यांनी आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,२७/०७/२०२३ रोजी शासकीय वेळेनुसार आपली हजेरी नोंदवली नव्हती.उपस्थित कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र दर्शनी भागात लावले नव्हते.सदर बाब कार्यालयीन शिस्त राखण्यासाठी व प्रशासनाची जनमानसातील प्रतिमा मलीन करणारी असल्याने युवराज पोटे यांनी बारामती तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तहसीलदार साहेब यांनी तात्काळ २४ तासाच्या आत १० कर्मचाऱ्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले..

त्यामध्ये श्रीमती शिंदे.वं.उ.अव्वल कारकून,श्रीमती लोखंडे.प्र. सं.पुरवठा अव्वल कारकून,डिस्टेवाड शी.रा.अव्वल कारकून,जगदाळे.र.ना.अव्वल कारकून श्रीमती.चौधर. दि.दि.महसूल सहाय्यक,श्रीमती खाडे. का.वि.महसूल सहाय्यक,श्रीमती बंडगर सु.धो.महसूल सहाय्यक,श्री.गायकवाड रा. व.तलाठी,भगत प्र.सु. तलाठी.१०)श्री बडगे वि.बा.शिपाई.या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तहसीलदार यांनी काढलेल्या नोटिसमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम१९७९ व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम १९७९.मधील तरतुदीनुसार कार्यवाही का करू नये याबाबत २४ तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे. यामुळे आता तरी या शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेचे भान करणार का ? हे येत्या काळात दिसून येईल…

बातमी चौकट

“प्रशासनातील वेळेचे महत्त्व टिकून राहण्यासाठी व कार्यालयीन कामकाज वेळेवर शिस्तबद्ध पध्दतीने चालू राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सयंत्र बसविणे व कामकाज जागा सोडताना नोंदवही मध्ये कारण नोंदविणे याबत प्रशासनाने दखल घेतली.तर सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात त्रासातून मुक्त होईल.परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे याची खंत वाटते..

युवराज पोटे ( अध्यक्ष ज्ञानभावी सेवाभावी संस्था )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *