बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीच्या महिला रुग्णालयात महिला रुग्णांची लूट केली जात असून,नातेवाईक व पेशंट ची हेळसांड केली जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी पुढे येत असून याबाबत भाजप चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मच्छिन्द्र टिंगरे यांनी याबाबत पाठपुरावा सुरु केला आहे. महिला रुग्णालयात गरोदर महिलांना बाहेरच्या दवाखाण्यात सोनोग्राफी करण्यासाठी दवाखान्यातील डॉक्टर पाठवत आहेत. या शिवाय गोळ्या औषधं ही बाहेरून आणायला लावली जात आहेत. कोणत्याही किरकोळ कारणासाठी रुग्णांच्या नातेवाईकडून पैसे उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
याबाबत मच्छिन्द्र टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार देऊन पुरावे सादर करताच दोघांनी ही तात्काळ चौकशी चे आदेश दिले. याबाबत चौकशीत दोषी आढळल्यास आपण टोकाची कारवाई करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले.
याबाबत ज्या रुग्णांची या महिला रुग्णालयातून लूट झाली आहे अशा रुग्ण व नातेवाईकांनी तक्रारीसाठी पुढं यावं असे आवाहन मच्छिन्द्र टिंगरे यांनी केले आहे. तर या पुढे गोळ्या औषधं, रक्ततपासणी, आणी सोनोग्राफी साठी कोणत्या डॉक्टर ने चिट्ठी दिल्यास त्या चिठ्ठीचा फोटो काढून 9527547547या नंबर वर पाठवण्याचे आवाहन मच्छिन्द्र टिंगरे यांनी केले आहे.