BIG BREAKING : भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी;अवघ्या काही तासांतच खुनाचा छडा लावत आरोपीस ठोकल्या बेडया….


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मदनवाडी येथे काल एक महिला जळालेल्या अवस्थेत पडलेली मिळून आली होती..गंगुगाई उर्फ वैशाली कल्याण काळे,वय.४७ वर्षे ( रा.मदनवाडी,भकासवाडी, ता.बारामती ) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.भिगवण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावत आरोपीस अटक केले आहे काळु उर्फ दादा श्रीरंग पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३०२,२०१,सह अनुसुचीत जाती आणी जमाती अत्याच्यार प्रतिबंधक सुधारीत अधिनियम.सन.२०१५ चे.कलम. ३ (२) (v) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की,दि.०६/०६/२०२३ रोजी सकाळी ०८:०० वा कच्या सुमारास भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या भकासवाडी जवळ एक महीला जळालेल्या अवस्थेत पडलेली पडलेली मिळून आली.तांत्रिकदृष्ट्या पोलिसांनी मयताची ओळख पटवत गुन्ह्याचा तपास सुरू केला, मताचे पोस्टमार्टम केल्यानंतर मयताचा गळा दाबुन तिचा खुन करून पेटवुन दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. मयताची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी मदनवाडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून काळु उर्फ दादा श्रीरंग पवार याला ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता,त्याने खुनाची कबुली दिली.मयत महिलेने आरोपीकडे तुम्ही माझा व माझे मुलांचा सांभाळ करणार आहे का नाही ? नसेल तर दिलेले पैसे परत दया “असे म्हणल्याने आरोपीने सदर महिलेचा खून केल्याचे कबूल केले.या गुन्हयाचा अधिक तपास बारामतीचे पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे हे करीत आहेत..

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे,बारामती पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर,विनायक दडस पाटील, रूपेश कदम,पोलीस अंमलदार सचिन पवार,महेश उगले, अंकुश माने,हसीम मुलाणी यांच्या पथकाने केलेली आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *