BIG BREAKING : राज्य सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण व्हावा म्हणून खासगी दूध संघानी दुधाचे दर पाडले असल्याचा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मच्छिंद्र टिंगरे यांचा आरोप…


कृत्रिमरित्या दर पाडल्याने दूधसंघावर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करणार…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्रातील युवा शेतकरी दुधाच्या व्यवसायकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. सध्या गुजरात मधील अमूल आणि या दूधसंघांचे महाराष्ट्रात देखील दूध संकलन होत आहे. ३.५ फॅट आणि ८.५SNF असलेल्या दुधाला अमूल चा दर ३८ ते ३९ रुपये आहे.तर महारष्ट्रातील दूध खासगी दूध संघ ३० तें ३३ रुपयांपर्यंत दर देत आहेत. महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येऊन सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण व्हावा यासाठी दुधाचे दर पाडले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रपंच्याशी खेळू नका.दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाला हातभार लावणारा व्यवसाय आहे. अनेक तरुण शेतकऱ्यांनी कर्ज घेउन हा व्यवसाय सुरु केला आहे. राज्यातील खासगी दूध संघ हे एका विशिष्ट पक्षाशी निगडित आहेत.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या मनात सरकार बद्दल असंतोष निर्माण व्हावा.म्हणून दूध दर कमी करण्याचं कुंभाड रचलं जात आहे. परंतू राजकारण हे शेतकऱ्याच्या प्रपंच्यावर नांगर फिरेल असं करू नका असं मत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मच्छिन्द्र टिंगरे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डेअरी चालक उचल देऊन घेईल त्या दराने दूध घालायला भाग पाडतात. दुसरीकडे चांगला दर असूनही शेतकऱ्याला दूध घालता येत नाही. एक प्रकारे हे शेतकऱ्यांकडून खंडणी वसुल केली जात आहे. शेतकऱ्याला जिथं चांगला दर मिळेल तिथे दूध घालायची मुभा असावी. शेतकऱ्याने दूध डेअरी बदलल्यावर दुधाची उचल तीन महिन्यापर्यंत वसुल करण्यात येऊ नये याबाबत शासनाने परिपत्रक काढावे ही विनंती सरकारला करणार आहे.लवकरच आपण हा विषय मुख्यमंत्री वं उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार असून या बाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याचे मच्छिन्द्र टिंगरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *