इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यात शेतीला पुरेशा दाबाने व सुरळीत वीज पुरवठा यासाठी पुणे जिल्हा नियोजन वार्षिक आराखडा सन २०२२-२३ मधून नवीन २१ रोहित्रे बसवण्यासाठी १.२४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.१७) दिली.इंदापूर तालुक्यात शिवसेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून निधीचा ओघ चालूच आहे.सदर निधी मंजूर केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले.
बावडा बारावा फाटा गाडामोडी येथे वीज रोहित्राला १००/११ केव्हीचे जादा रोहित्र बसविणे (रु.६ लाख ४५९७०), कौठळीतील विठ्ठल काळेल रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ४२७१०),टणू देशमुख रोहित्राला जादा रोहित्र (रु.३ लाख ८३५००), बोराटवाडी फडतरे रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ४८१५०),लाखेवाडी चौफुला रोहित्राला जादा रोहित्र (रु.७ लाख ५५२५०) सराटी रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ५५२४०) काटी मुलाणी रोहित्राला जादा रोहित्र (रु.५ लाख ५६९८०),बावडा गावठाण दलित वस्ती रोहित्राला जादा रोहित्र (रु.३ लाख ८३५००),काझड दासा पाटील रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ५८६९०),नरसिंहपुर आडोबा वस्ती सिंगल फेज रोहित्राला जादा रोहित्र (रु.३ लाख ६९०८०),पिठेवाडी मासाळ रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ८८५१०),लुमेवाडी-निंबोडी येथील लावंड रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ५५२४०),लाखेवाडी खंडू ढोले रोहित्राला जादा रोहित्र ( रु.५ लाख ०१५००) भगतवाडी(कचरवाडी बा.,) शिव वीज रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ४५९७०),गोंदी हमीददुल्ला रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ५५२४७),बावडा पवन घोगरे रोहित्राला जादा रोहित्र (रु.६ लाख ६५८००),बावडा स्वप्निल घोगरे रोहित्राला जादा रोहित्र (रु.७ लाख ६९९९०),बावडा सावंत वस्ती रोहित्राला जादा रोहित्र (रु.५ लाख ८७०४०),पिंपरी बु. रासकर रोहित्राला जादा रोहित्र (रु.५ लाख ०१५००),वकीलवस्ती शेरकर बाबा रोहित्राला जादा रोहित्र (रु.५ लाख ०१५००),बोराटवाडी शिव वीज रोहित्राला जादा रोहित्र (रु.५ लाख ६५८००),
इंदापूर तालुक्यात ठीक-ठिकाणी विजेच्या वाढत्या लोड मुळे विद्युत मोटारी वारंवार बंद पडून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत होते.नवीन रोहित्रे (डि.पी.) बसविण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकार कडून इंदापूर तालुक्यातील विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही,असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.