बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुनिल वसंतराव पवार यांची तर उपसभापतीपदी निलेश भगवान लडकत यांची बिनविरोध निवड करण्यात आली राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी नावे जाहीर केली.
यामध्ये राष्ट्रवादीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापतीपदी सुनिल सुनिल वसंतराव पवार,(रा.माळेगाव खुर्द) यांची तर उपसभापतीपदी निलेश भगवान लडकत (रा.शेरेवाडी- बाबूर्डी) यांची नावे जाहीर केली.दोन अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टाकसाळे यांनी काम पाहिले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष दूध संघाचे चेअरमन संदिप जगताप,बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय आवळे,तुषार कोकरे, सुनिल बनसोडे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.