इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्याला ताब्यात घेतले असून,संग्राम विलास मदने वय.२७ वर्षे ( रा.काटी,ता.इंदापूर जि.पुणे ) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बेकायदेशीर,विनापरवाना पिस्टल बाळल्यामुळे त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,दि.१५ मे रोजी गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार,इंदापूर तालुक्यातील काटी गावातील
वेताळ बाबा मंदिराजवळ एकजण कंबरेला गावठी पिस्टल लावून थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तात्काळ त्याठिकाणी जात, एकाला ताब्यात घेतले.पोलिसांची चाहूल लागताच,त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता,पोलिसांनी त्याला जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली असता,त्याच्या कंबरलेला एक गावठी पिस्टल व खिशामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले..
ही कामगिरी पुणे पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार,गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,नागनाथ पाटील,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव,प्रकाश माने,पोलीस नाईक सलमान खान,पोलीस कर्मचारी नंदू जाधव,विनोद लोखंडे,गजानन वानूळे,गणेश डेरे,अकबर शेख, विकास राखुंडे,होमगार्ड संग्राम माने यांच्या पथकाने केलेली आहे…