पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुण्यात १२ मे रोजी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर काही इसमाने कोयत्याने वार करत गोळीबार केला होता, यात उपचारादरम्यान आवारे यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी आवारे यांच्या खून प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सुधाकर शेळके,संदीप गराडे, श्याम निगडकर सह ७ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किशोर आवारे यांच्या आई सुलोचना गंगाराम आवारे यांच्या फिर्यादीवरुन तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
याबाबत सविस्तर माहिती अशी की,जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी १२ मे रोजी तळेगाव नगरपरिषदेच्या
कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला.गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते.हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते.त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून आवारेंचा या हल्यात मृत्यू झाला.