इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील कालठन नंबर.२ येथे झालेल्या दरोड्यात घरात घुसून कोयत्याचा दात दाखवत तीन मोबाईल व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने पळवणाऱ्या तिघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी शुभम उर्फ दिलशार अशोक पवार,वय.२२ वर्षे ( रा.दुधवडी,ता.कर्जत,जि. अहमदनगर,उमेश अनिल काळे वय.१९ वर्षे मुळ ( रा.लोखंडेवस्ती,कटफळ, ता. बारामती.जि.पुणे )आदेश अनिल काळे वय.१९ वर्षे, रा.लोखंडेवस्ती,कटफळ,ता.बारामती जि.पुणे )यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेत,त्यांच्या ताब्यातील १० तोळे सोन्याचे दागिणे आणि ३ मोबाईल असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे…
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की,इंदापूर तालुक्यातील कालठण नं. २ येथे नवनाथ मिटकरी यांच्या घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करत तब्बल दहा तोळे सोन्याचे दागिने व तीन मोबाईल असा मुद्देमाल चोरीस नेल्याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून,याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या, त्याअनुषंगाने इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देत माहिती घेतली होती.त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने संशयित आरोपी शुभम उर्फ दिलशार पवार,उमेश अनिल काळे,आदेश अनिल काळे यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेत,चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देत,त्यांनी कालठण नं.२ या गुन्ह्यासह इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे गुन्हा केल्याचे कबूल केल्याने,घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले.या पुण्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींच्या ताब्यातील दहा तोळे सोन्याचे दागिने व तीन मोबाईल असा पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,प्रकाश पवार,सहा.फौ. भरत जाधव, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव प्रकाश माने,शुंभागी खंडागळे, पोलीस नाईक संजय मल्हारे, सलमान खान,पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव,गजानन वानूळे,विनोद लोंखडे,लक्ष्मण सुर्यवशी,गजेंद्र बिरलिंगे अमोल खाडे,होमगार्ड संग्राम माने यांच्या पथकाने केलेली आहे.