बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र टिंगरे यांनी दोन मे रोजी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर केलेल्या एका पोस्ट केली. त्या पोस्टवर विजय गावडे (रा.मळद,दत्तनगर, ता. बारामती )यांनी आक्षेपार्ह लिखाण केले.याबाबत मच्छिन्द्र टिंगरे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून विजय गावडे पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तक्रारीत विजय गावडे या याने मच्छिन्द्र टिंगरे व त्यांच्या आईबद्दल बदनामी होईल असे लिखाण केल्याचे म्हटले आहे.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करत आहेत.
मच्छिन्द्र टिंगरे यांच्या आई मालन टिंगरे या ग्रामपंचायत सदस्य असून त्यांनी याबाबत राष्ट्रवादी हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे.असा दावा केला जात आहे तर मग आता महिलांचा इतक्या खालच्या पातळीला जाऊन अपमान कारणाऱ्या कार्यकर्त्याला हाकलून देणार का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे..
चौकट : दरम्यान मच्छिन्द्र टिंगरे यांनी याबाबत विजय गावडे व त्याच्या कुटुंबाची पक्षातून हाकलपट्टी करावी अशी मागणी.विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सांभाजी होळकर यांच्याकडे केली आहे.टिंगरे यांनी मेसेजद्वारे अजित पवार व संभाजी होळकर यांना ही घटना कळवली आहे.याबाबत राष्ट्रवादी पक्षाने ठोस भूमिका न घेतल्यास आपण आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.