BIG BREAKING : इंदापूर तालुक्यातील शेटफळगडेच्या माजी उपसरपंचासह एकावर बाल लैंगिक अत्याचारासह,अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल…


संबंधित पुण्यातील एक आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती…

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील माजी उपसरपंचासह एकाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, संबंधित घटनेने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.यामध्ये संबंधित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार, वय.४५ वर्षे ,व रमेश रघुनाथ मोरे वय.३५ वर्षे ( दोघेही रा. शेटफळगडे,ता.इंदापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत..याप्रकरणी भिगवण पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या आरोपींपैकी एक जण या गावचा माजी उपसरपंच असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार,जानेवारी २०२३ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत शेटफळगडे परिसरातील एका वीटभट्टीच्या ठिकाणी पीडित युवतीवर वेळोवेळी अत्याचार झाला. संबधीत पीडित युवती अल्पवयीन असताना देखील तिचा गैरफायदा घेऊन तुझ्या वडिलांकडे तुझी बदनामी करू अशी धमकी देत वेळोवेळी या शारीरिक संबंध प्रस्थापित करत दोघा नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले.बदनामीच्या भीतीपोटी पीडितेने ही बाब कोणाला सांगितली नाही,मात्र यातून ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील एकास अटक केली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *