बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरात ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनगर्जना मोर्चात दोन धर्मात तेढ निर्माण करणारे आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग (रा. अकोला) व या मोर्चाचे आयोजक विकास महादेव देवकाते या दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतुल उत्तम जाधव यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १५३,५०५ (२),३४ नुसार,तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,९ फेब्रुवारी रोजी बारामती मध्ये हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चासाठी कालीचरण महाराज यांना निमंत्रित करण्यात
आले होते.यावेळी त्यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य तसेच जातीय तणाव निर्माण करणारे वक्तव्य केले होते…