चोरीचे दोन उघडकीस आणत, तब्बल ६ लाखांचा मुददेमाल केला हस्तगत….
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ग्रामसेवकाचे अपहरण करून खुनाच्या गुन्ह्यात पैठण कारागृहात शिक्षा भोगत असताना,२०१९ साली कारागृहातून पळून गेलेल्या व काही गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून,त्याच्यासह दोघांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी अमोल अंबादास बनकर,वय.३१ वर्षे,आदेश बाळू बोराटे, वय.२३ वर्षे,शुभम महादेव इनामे, गणेश रामचंद्र इनामे, वय.२२ वर्षे सर्वजण ( रा.काटी,ता.इंदापूर ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत..
याबाबत सविस्तर माहिती अशी की,२०१० मध्ये साथीदारांसह ग्रामसेवकाचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अमोल बनकर याला न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती,यात बनकर हा पैठण कारागृहात शिक्षा भोगत असताना, २०१९ साली कारागृहातून पळून आला होता.याप्रकरणी त्याच्यावर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,गोपनीय बातमीदारांमार्फत इंदापूर गुन्हे शोध पथकाला बनकर हा इंदापूर मध्ये येणार असल्याची माहिती मिळाली असता,गुन्हे शोध पथकाने बनकर याला ताब्यात घेत चौकशी केली असता,त्याने त्याचे साथीदार आदेश बोराटे, शुभम इनामे व गणेश इनामे यांच्यासह इंदापूर येथील एक दुकान फोडून त्यातील वस्तू चोरी करत इंदापूर तालुक्यातील पळसगाव येथील दोन जर्सी गाया चोरी केल्याचे उघडकीस आले.. इंदापूर गुनेश्वर पथकाने पुण्यातील चोरी केलेल्या दोन जर्सी गाया दुकानातील चोरी केलेल्या वस्तू व एक पिकप व एक मोटरसायकल असा तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला..
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,नागनाथ पाटील पोलीस कर्मचारी नंदू जाधव,प्रकाश माने,पोलीस नाईक सुकुमार भोसले, सलमान खान,जाधव,गजानन वानूळे, विकास राखुंडे यांनी केलेली आहे…