BIG BREAKING : वासुंदे ग्रामपंचायत बनावट फेरफार व बेकायदेशीर ठराव प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश;याप्रकरणी चौकशी करिता नेमली चौकशी समिती…


चौकशी समितीकडून चौकशीसाठी चालढकल होत असल्याचा तक्रारदारांचा आरोप…

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड तालुक्यातील वासुंदे या ठिकाणी मोठया प्रमाणावर अवैध खडी क्रशरच्या माध्यमातून शासनाच्या डोळ्यात दिवसा ढवळ्या धूळ फेकत उत्खनन चालु असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरज सवाणे यांनी दौंड तहसील कार्यलयात तक्रार दाखल केली आहे.. दौंड गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत वासुंदे प्रकरणी बेकायदेशीर ठराव व बनावट फेरफार प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून अद्यापही चौकशी समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नसून चौकशी अधिकारी या प्रकरणाची जाणीवपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप तक्रारदार सुरज सवाणे यांनी केला आहे..

याबाबत तक्रारदार सवाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुंदे ग्रामपंचायतीची माहिती अधिकारात माहिती मागवली असता त्यातून धक्कादायक माहिती समोर आली असून,वासुंदे येथील सरपंच,उपसरपंच,व सदस्य यांनी पदाचा गैरवापर करून बनावट फेरफार व बेकायदेशीर ठराव करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आले असून,वासूंदे हद्दीत बेकायदेशीर सुरू असणाऱ्या खडी मशीनला ना – हरकत दाखले,परवाना नसणाऱ्या खडी मशीन व स्टोन क्रशरवर कार्यवाही करावी असा सर्वानुमते ठराव ग्रामपंचायती मध्ये झाला असून,भ्रष्टाचारापोटी बेकायदेशीर रित्या ना – हरकत दाखले व परवाने दिलेले दिसून आले आहेत. दरवर्षी शासनाचा कोट्यवधी महसूल काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बुडवला जात असल्याची शंका सवाणे यांनी व्यक्त केली..

याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले असून, दौंड गटविकास अधिकारी यांनी देखील तत्परता दाखवत याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून,मात्र वीस ते पंचवीस दिवस चौकशी समिती नेमली असताना देखील, चौकशी समिती अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यास चालढकल होत असल्याचा आरोप देखील तक्रारदार सवाणे यांनी केला आहे.. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का ? आणि याप्रकणातील दोशींवर कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

बातमी चौकट :

वासुंदे ग्रामपंचायतप्रकरणी बनावट फेरफार व बेकायदेशीर रित्या बनवलेले ठराव याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती देखील नेमली आहे..मात्र असे असताना चौकशी समितीतील अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही तर याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेसोबत आमरण उपोषणाला बसणार आहे…

सुरज सवाणे ( वासूंदे ग्रामपंचायत प्रकरणातील तक्रारदार )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *