इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
इंदापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता तसेच मोठ्या कडकडासह आवाज होवून वीज झाडावर पडली होती. इंदापूर नजीक मोरे मळा येथे बाळासाहेब मोरे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर मोठ्या आवाजासह वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतला होता.वीज पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मोरे मळा वस्तीवर येऊन परिसराची पाहणी केली..
हर्षवर्धन पाटील म्हणाले की इंदापूर तालुक्यामध्ये काल अचानकपणे वादळ ,गारपीट तसेच वीज कोसळून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाईची मदत मिळावी.इंदापूर तालुक्यात अचानकपणे काल सर्व भागात चक्रीवादळ व गारासह पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, जनावरांचे नुकसान झाले आहे. फळबाग व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारला मागणी केली आहे की ताबडतोब पंचनामे करा व झालेल्या नुकसानीची मदत मिळावी. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांशी संपर्क करत अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत,तसेच लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले…