BIG BREAKING : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इंदापूरातील हॉटेलच्या पार्किंग मधून जप्त केला तब्बल ३३ लाख ७५ हजारांच्या गुटख्याच्या मुद्देमलासह जप्त केला ४० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त…


पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची व भिगवन पोलिसांची संयुक्त कारवाई…

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदय हॉटेलच्या पार्किंगमधून विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याने भरलेला कंटेनर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला असून,या कारवाईत विक्रीस बंदी असलेला ३३ लाख ७५ हजारांच्या गुटख्यासह ७ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
केला आहे.भिगवण पोलिसांनी व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिळून ही संयुक्तरीत्या कारवाई केलेली आहे.याप्रकरणी संशयित आरोपी इब्राहिम अब्दुल रशीद, नवाज लालनसाहब कुरेशी यांच्यावर भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी स्वप्निल अहिवळे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेल्या अधिक माहितीनुसार,इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदय हॉटेलच्या पार्किंग मध्ये गुटख्याने भरलेला ट्रक उभा आहे,अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने, भिगवण पोलिसांनी मिळून संयुक्तपणे छापा टाकला असता,हॉटेलच्या पार्किंगमध्ये अशोक लेलंड कंपनीच्या ट्रक पोलिसांना मिळून आल्याने,पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता,अवैधरित्या ३३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल मिळून आला.पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला.हा गुटखा कोठून आणला होता व कोणास विक्रीसाठी घेऊन चालला होता याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलीसांकडून तपास चालू आहे..

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक अमित शिद पाटील,पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम,पोलीस हवालदार स्वप्निल अहिवळे, अभिजीत एकशिंगे,पोलीस नाईक मुळीक पोलीस कर्मचारी मुलानी,माने यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *