बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी काही दिवसांपुर्वी माहिती अधिकारात वर्षा निवासस्थानवर चहापान खर्चाची जी वारेमाप उधळपट्टी होत होती त्याची माहिती मिळवली होती.नुकतेच राज्य सरकारने या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी शासन निर्णय काढला असुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे वर्षा व सागर या दोन्ही शासकीय निवासस्थानावर ५ कोटींची वार्षिक तरतुद केली आहे.
आता शिंदे सरकारने यापुढील काळात सर्वच खर्चावर नियंत्रण आणुन सर्वसामन्य जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी अशी विनंती देखील नितीन यादव यांनी सरकारला केली आहे.