Harshwardhan patil : बावडा भागातील भाजप शिवसेना सरकारने दिलेल्या निधीवरून विरोधकांनी जनतेची दिशाभूल करू नये, हर्षवर्धन पाटलांचा भरणेंवर निशाणा…


हर्षवर्धन पाटलांनी मानले सरकारचे आभार….

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शिवसेना-भाजप सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा – २ मधून बावडा भागातील ग्रा.मा.८२ ते प्र.जि.मा.१२५ पर्यंत भांडगाव गायकवाड माने वस्ती ग्रा.मा.१०४ रस्ता (४ कि.मी.) आणि बावडा एन.एच.९६५G (जुना रा. मा.१२०) ते प्र.जि.मा.१५९ पर्यंत इ.जि.मा.२१५ मानेमळा अनपट वस्ती रस्ता ( ४.६५ कि.मी.) या दोन रस्त्यांसाठी ५ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.हा निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पत्राद्वारे या दोन रस्त्यांसह एकूण १६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी देण्याची मागणी आंम्ही केली होती.
यामध्ये शेटफळ पाटी ते भांडगाव रस्ता एन.एच.९६५G ते ग्रा. मा.१०४ पर्यंत ग्रा. मा. ८२ रस्ता करणे २ कि.मी. व ग्रा. मा. ८२ ते प्र.जि.मा.१२५ पर्यंत रस्ता करणे ग्रा. मा.८२ रस्ता करणे ४ कि.मी. प्रस्तावित केला आहे. या पैकी ४ कि.मी.लांबीचा रस्ता करण्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे व उर्वरित २ कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी लवकर निधीस मंजुरी मिळणार आहे.

तसेच बावडा एन.एच.९६५G ते प्र.जि मा.१५९ घोलपवस्ती, मानेमळा, अनपट वस्ती रस्ता इ.जि.मा. २१५ हा रस्ता ५ कि.मी. प्रस्तावित केलेला होता. यापैकी ४.६५ कि.मी.लांबीच्या रस्तास मंजुरी देऊन ३ कोटी १० लाख एवढा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे, यासंदर्भात ग्रामविकास विभागाने आदेश परीत केल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.शिवसेना-भाजप सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी आणणेसाठी आंम्ही सतत प्रयत्नशील आहोत. निधी आणल्याचे श्रेय घेऊन विरोधक हे जनतेची जाणूनबुजून दिशाभूल करीत आहेत. राज्यात सत्तेवर शिवसेना-भाजप सरकार आलेले आहे हे सत्य स्वीकारून विरोधकांनी आता तरी विकास कामांचे श्रेय घेण्याची जुनी सवय बंद करावी, असा टोला यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लगावला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *