बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ग्राहकांना घरगुती वापरासाठी वर्षभर लागणारा गहू, तांदूळ, ज्वारी कडधान्य, डाळी थेट शेतकऱ्याकडून खरेदीची सुवर्णसंधी या महोत्सवातून मिळत आहे याचे उद्घाटन एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे विश्वस्त मा. सौ. सूनंदाताई पवार यांच्या हस्ते रयत भवन मार्केट यार्ड या ठिकाणी झाले. ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती आणि शारदा महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धान्य महोत्सवामध्ये सातारा, पुणे, छत्रपती संभाजी नगर,हिंगोली,सोलापूर,अहमदनगर इत्यादी ठिकाणचे धान्याचे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये कडधान्य तसेच विविध प्रकारचा डाळी उन्हाळी पदार्थ, यासह भरड धान्य व त्याचे विविध प्रक्रिया पदार्थ हे विक्रीसाठी आहेत.विविध प्रकारच्या चटन्या ,मसाले, मशरूम आणि त्याचे प्रक्रिया पदार्थ हेही या ठिकाणी आपणाला मिळणार आहेत. भीमथडी फाउंडेशन यांच्यामार्फत तयार केलेले भरडधान्य व त्याचे विविध उपपदार्थ आहेत,तसेच अधिक कुरकुमिन असलेली हळद व परस बागेसाठी लागणारी विविध प्रकारची भाजीपाला रोपे या ठिकाणी आपणाला खरेदी करता येतील.
नाचणी, तांदूळ तसेच जामखेड येथील दुर्मिळ आरोग्यदायी चिया ही या ठिकाणी ठेवलेले आहे या धान्य महोत्सव मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गट सहभागी झालेले आहेत त्यांच्या शेतामध्ये हे सर्व उत्पादने तयार झाली आहेत दरवर्षीप्रमाणे हा महोत्सव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरवलेला आहे हा नववा धान्य महोत्सव आहे. रविवारी ९ एप्रिल पर्यंत हा धान्य महोत्सव सुरू राहणार आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र मार्फत करण्यात आले आहे.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अविनाश बारवकर तसेच विष्णुपंत हिंगणे,कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ.धीरज शिंदे, संतोष गोडसे,सचिन खलाटे तसेच मार्केट कमिटीचे संचालक श्री अरविंद जगताप हे उपस्थित होते.