इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव आणि मूल्याधिष्ठित राजकारणामुळे भारताची जगामध्ये महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, देश – महाराष्ट्र राज्य हे सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर आहे, असे गौरोदगार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.भारतीय जनता पार्टीचा दि.६ एप्रिल १९८० हा स्थापना दिवस असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक व जनतेला शुभेच्छा व्यक्त केल्या.
ते म्हणाले,भाजप हा देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असून, संसदेमध्ये ५४५ पैकी तब्बल ३०३ खासदार हे भाजपचे आहेत. भाजप हा देशात सर्व भागात घराघरात पोहोचला पक्ष असून,जनतेच्या सेवेसाठी पक्षाचे कार्यकर्ते झटत आहेत.कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपने देशा सत्ता मिळवले असून,पक्षाला मोठे करण्यामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे.भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या दशकामध्ये देशात प्रगतीचा मोठा टप्पा पार केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय असे नेते बनले आहेत, सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.
पक्षाचे अध्यक्ष डॉ.जे.पी.नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व देश मजबुतीसाठी झटत आहे. पक्षाच्या स्थापनेनिमित्त दि.६ ते १४ एप्रिल या कालावधीत देशभर सामाजिक न्याय सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती या साप्ताहात जनतेला दिली जाईल,अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.