भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शेताच्या वादावरून भिगवण पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पंचवीस हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून,रामदास लक्ष्मण जाधव (पोलिस हवालदार,भिगवण पोलिस स्टेशन,) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलीस हवालदार रामदास जाधव यानी २५,०००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. २५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती २० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलातील भिगवण पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला…
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या शेताच्या वादावरून भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.गुन्हयामध्ये ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिस हवालदार रामदास जाधव यांनी सर्वप्रथम २५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पोलिस हवालदार रामदास जाधव यांनी तडजोडीअंती २० हजार रूपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रामदास जाधव यांच्याविरूध्द भिगवण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.शासकीय अधिकारी,कर्मचारी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे