BIG BREAKING : वासुंदे येथील खडी क्रेशर प्रकरणात ४८ तासांत खुलासा सादर करा, अन्यथा दप्तर दिरंगाई कायद्यानुसार मंडल अधिकाऱ्यावर कारवाईचे तहसीलदारांचे आदेश…


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीत खडी क्रेशर माफी यांनी मोठे थैमान घातले आहे वासुंदे येथील सद्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे.कारण मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, सजीव सृष्टीला गंभीर धोका निर्माण झाला आहे..तसेच अनेक प्रकारे तक्रारी देऊन सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..

त्यामुळे सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या संस्थापक अध्यक्ष भालचंद्र सर्जेराव महाडिक यांनी सर्व विषयांचा पाठपुरावा केला आहे.त्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा २००६ अन्वये पाटसचे मंडल अधिकारी सुनिल नारायण गायकवाड यांच्यावर कारवाईचे आदेश दौंडचे तहसिलदार यांनी दिले आहेत..व जो पर्यंत तेथील खडी क्रेशर बंद होणार नाही तो पर्यंत सजीव संरक्षण आणि जागृती संस्थेचा लढा सुरू राहणार आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *