Ajit pawar : कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेणे किती महत्वाच आहे,हे उभ्या राज्याला कोरोनाने दाखवून दिले : अजित पवार….


युवा पिढीने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे अजित पवारांचा बारामतीकरांना सल्ला…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क….

गेल्या काही वर्षापासून आपले आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे कोरोनाने संपूर्ण राज्याला दाखवून दिले आहे,त्यामुळे आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे,त्यामुळे मी देखील मी सुद्धा माझं मास्क घातलेलं दिसत आहे.यावेळी अजित पवार म्हणाले की, डॉक्टरांनी देखील आव्हान केल आहे की तुम्ही मास्कचा वापर करा,गर्दी टाळा आपल स्वतः च आरोग्य चांगले ठेवले पाहिजे दुर्दैवाने अलीकडच्या काळात काही पीडिला व्यसन लागतात,ती व्यसन अतिशय शरीर प्रकृतीला घातक आहेत..

त्यामुळे अशा गोष्टींना स्पर्श देखील होऊन द्यायचा नाही असा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे.. हा सगळा प्रयत्न करत असताना आपले सगळ्यांचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. त्यामुळे असं जाहीर भाषणात सांगून प्रयत्न होत नसतात.आपल्या आहारावर देखील नियंत्रण असले पाहिजे. रोज नियमित व्यायाम केला पाहीजे.असा सल्ला अजित पवारांनी बारामतीकरांना दिला.यावेळी अजित पवार बारामती मधील जिम उद्घाटनप्रसंगी बोलत होते…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *