मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली.तसेच त्यांची एमसीएच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली मात्र,ही निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण शिंदे गटाचे नेते व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन खळबळजनक दावा करत गौप्यस्फोट केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका करतानाच धक्कादायक खुलासा केला आहे.यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न खुद्द अजित पवार यांनी केल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे.अजित पवार यांच्यावर टीका करताना नरेश म्हस्के म्हणाले,’पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते,अजित पवार,आधी आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा,असं वक्तव्य म्हस्के यांनी केलंय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते.त्यांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचा आरोप म्हस्के यांनी केलाय.