इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे सोलापूर महामार्गावरून कर्नाटक हून अकलूज-इंदापूर मार्गे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपवर इंदापूर पोलिसांनी थेट कारवाई करून, कारवाईत १८ लाखांच्या गुटख्यासह २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी प्रकाश कुशान हेगरे,वय.२६ वर्षे ( रा.कोकटनूर,ता. अथनी जि. बेळगाव ) व मल्लू जयश्री मेलगडे ( रा. अर्जुनगी,ता.बबलेश्वर,जि. विजापूर ) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३२८,१८८,३४ यांसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार कर्नाटकहून अकलूज-इंदापूर मार्गे पुण्याच्या दिशेने अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा पिकअप येणार असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार इंदापूर पोलिसांनी सापळा रचत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोल पंप या ठिकाणी ताब्यात घेत पाहणी केली असता,गाडीमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा मिळून आला.या कारवाई पोलिसांना १८ लाखांच्या गुटख्याच्या २४ लाखांचा मुद्देमाल मिळून आला…
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आनंद भोईटे,बारामती उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील योगेश लंगुटे,पोलीस अंमलदार सुनील बालगुडे, पोलीस शिपाई विकास राखुंडे यांच्या पथकाने केलेली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत…