BIG BREAKING : छगन भुजबळानंतर आता शिंदे गटाच्या या नेत्याला झाली कोरोनाची लागण; फेसबुकवर पोस्ट करत दिली माहिती…


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता शिंदे गटाचे नेते राज्यउत्पादन शुल्कचे कॅबिनेटमंत्री शंभूराजे देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे…शंभूराजे देसाई यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत ही माहिती दिली..

यामध्ये शंभूराजे देसाई म्हणतात की,माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही.गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी,असे आवाहन देखील देसाई यांनी नागरिकांना केले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *