BIG BREAKING : DYSP पद्माकर घनवट यांच्यासह वाई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल…


सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

साताऱ्यातील गुरुकुल स्कूल शिक्षण संस्थेप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि सध्या पिंपरी चिंचवड येथे डी.वाय.एस.पी असलेले पद्माकर घनवट आणि वाई पोलीस ठाण्यातील हवालदार विजय शिर्के यांनी २०१७ साली नाहक त्रास देत २५ लाखांची मागणी करत १२ लाख ३० हजार रुपये स्वीकारले होते.व्यवसायाने बिल्डर असलेले आणि शिक्षण संस्थेचे चेअरमन राजेंद्र चोरगे यांनी याबाबत तक्रार केली होती.

याप्रकरणी चोरगे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात धाव घेत दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.. हा प्रकरणाचा सातारा शहर पोलिसांनी तपास करून न्यायालयात अहवाल पाठवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.त्यानुसार आज डी.वाय.एस.पी घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमा नुसार खंडणी,भीती घालून पैसे घेणे कलम ३५२,३९२, ३८४,१९३,२०१,३४,१२० (ब ), भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७,१३,१३(१)(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने पोलीस दलात खळबळ उडालीये..

एलसीबीचे निरीक्षकपद वादग्रस्त का ?

पोलीस दलामध्ये एलसीबी हा विभाग महत्वाचा विभाग समजला जातो. परंतु सातारा पोलीस दलात पाठीमागेही घनवट यांच्या अगोदर असलेल्या एका पोलीस निरीक्षकांच्या कारनाम्याने त्यावेळी सातारा पोलीस खाते चर्चेत आले होते. घनवट हे चेहऱयावरुन तर अतिशय साधेभोळेच कोणालाही वाटतील परंतु पैशासाठी त्यांनी वर्दीलाही लाजवेल असे कृत्य केल्याचा बुरखा हा गुन्हा दाखल झाल्याने फाडला गेल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान,या दोघांना अटक होणार काय ? त्यांचे निलंबन होणार काय ? याकडे लक्ष लागून राहिले आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *