नागरिकांकडून भिगवण पोलिसांवर होतोय कौतुकाचा वर्षाव….
भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भिगवण पोलिसांनी भिगवण हद्दीतून चोरीस गेलेल्या तब्बल ३२ मोबाईलचा शोध घेत यासह एक मोटार सायकल ताब्यात घेत मोबाईलचा ५ लाख ३० हजारांचा व एक मोटारसायकल ८० हजार किंमतीची असा एकूण ६,१०,००० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून,हा मुद्देमाल भिगवण पोलिसांनी संबंधित नागरिकांना परत केलाय.या गोष्टीमुळे नागरिकांकडून भिगवण पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत वाढत्या मोबाईल चोरीचे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी तोच गेलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या शोधून ते तक्रारदारांना परत देण्याचे देण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या तपास करीत असताना निघून पोलिसांनी गोवा कर्नाटक व गुजरात या राज्यासह महाराष्ट्रातील यवतमाळ,बीड कोल्हापुर,सातारा,अहमदनगर, लातुर, उस्मानाबाद जिल्हातुन अप्पल,ओपो,व्हिओ,वन प्लस, सॅमसंग,एम.आय,आय टेल,अशा विविध कंपनीचे एकुण ३२ मोबाईल हस्तगत केले असून,या मोबाईलची अंदाजे रक्कम ५,३०,००० तसेच एक मोटार सायकल किंमत रूपये ८०,००० असा एकुण ६,१०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नागरीकांना परत केलेला आहे. या कारवाईत मेलेल्या मुद्देमाल नागरिकांना परत मिळाल्याने नागरिकांकडून भिगवण पोलिसांचे कौतुक केले जात आहे.तसेच सर्वसामान्य जनासामांन्याचे मनामध्ये पोलीसांचेबाबत आदर निर्माण होवुन आत्मविश्वास वाढला आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम,पोलीस अंमलदार महेश उगले,हसीम मुलाणी,अंकुश माने यांच्या पथकाने केलेली आहे.