BIG BREAKING : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना धक्का ;बारामती ॲग्रोच्या व्यवस्थापकीय संचालकाविरोधात भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल…


तारखेपुर्वी गाळपास सुरवात केल्याने भिगवण पोलीसात गुन्हा दाखल …

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याने नियमापूर्वी गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

इंदापूरातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने १५ आँक्टोबर २०२२ पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी केला होता.यानंतर साखर आयुक्तलय अंतर्गत विशेष लेखा परिक्षक यांच्या मार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले मात्र त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्याने लेखा परिपक्षकांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या चौकशी नंतर ०८ मार्च २०२३ रोजी भिगवण पोलिसात बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारखान्याने गाळप परवाना न घेता १५ आँक्टोबर पूर्वीच गाळप सुरु केल्याने साखर आयुक्त कार्यालयाच्या पत्रांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *