तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मा. कोर्टाने तक्रारदारास पोलिस ठाण्यात हजेरी देण्याबाबत आदेश दिले होते.त्या हजेरीची नोंद घेण्यासाठी व गुन्हयाच्या तपासात तक्रारदाराच्या बाजुने मदत करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदार प्रदीप काळे,( वय.४४ वर्षे ) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने तक्रारदारास हजेरी लावण्याचे आदेश दिले होते,त्यानुसार पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे व गुन्ह्यातील तपासात मदत करतो यासाठी ९००० लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.तक्रारीची पडताळणी केली असता पोलिस हवालदार काळे हे ९ हजारांची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे