माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नुकतेच शिंदे सरकारने ७ महिन्यात जाहिरातींसाठी ४२ कोटी रुपये शासकीय तिजोरीतुन खर्च केल्याची माहिती मला माहिती अधिकारात मिळाली होती.त्यानंतर आता माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास स्थानावर खानपान सेवेसाठी अवघ्या १२३ दिवसात २ कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असुन दिवसाला सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानावर होत असल्याची धक्कादायक माहिती बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव अधिकारात प्राप्त झाली आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानचा होणाऱ्या बेमाप खर्चाची धक्कादायक मिळवली आहे.यामध्ये सहयाद्री अतिथिगृहासाठी चहा कॅाफी नाष्ट्यासाठी ८ दिवसात तब्बल ९१ हजार ५०० रुपयांचा खर्च केल्याचे दिसुन येत असुन मुख्यमंत्री बैठक व त्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तींसाठी चहा कॅाफी थंडपेयेसाठी तब्बल ३ लाख ४९ हजार ९२९ रुपयांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे बेमाप होणार्या या उधळपट्टीवर अकुंश लावण्यासाठी शिंदे सरकारने प्रयत्न करावेत अशी विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे..