BIG NEWS : बनावट कागदपत्रे सादर करत तब्बल ४६ वाहनांची कर्ज प्रकरणे करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अ‍ॅटो लोन कॉन्सिलरनेच घातला ४७ कोटींचा गंडा..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोन कॉन्सिलरने बनावट अ‍ॅटोलोन प्रकरणे करुन स्टेट बँक ऑफ इंडियाला तब्बल ४६ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांना गंडा घातला आहे.याप्रकरणी संशयित आरोपी अदित्य नंदकुमार सेठीया (रा.प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी ) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकारी ममता कुमारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया युनिर्व्हसिटी रोड शाखा व टिळक रोड शाखेत २०१७ ते २०१९ दरम्यान घडला..

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,स्टेट बँकेच्या युनिर्व्हसिटी व टिळक रोड शाखेमधून २०१७ ते २०१९ दरम्यान ४६ वाहन कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. बँके अंतर्गत ऑडीटमध्ये ही प्रकरणे संशयित असल्याचे निष्पन्न झाले. बँकेने अ‍ॅटो लोन कॉन्सिलर म्हणून सेठीया याची नेमणूक केली होती. त्याने कर्जदार व इतरांशी संगनमत करुन वाहन कर्ज घेण्यासाठी कट रचला.खोटे व बनावट कोटेशन,टॅक्स इन्व्हाईस, मार्जिन व काही फुल पेमेंटच्या रिसीट तयार केल्या. त्या खरे असल्याचे भासवून बँकेतून मोठ्या प्रमाणावर वाहन कर्ज मंजूर करुन घेतले. त्यातील काही प्रकरणांमध्ये ते सुरुवातीला काही इतर खात्यावर वर्ग करुन नंतर संबंधित वाहन कर्जदार याचे नावावर वर्ग केले. त्यामुळे बँकेची मूळ वाहन कर्ज मंजूर केलेल्या ४७ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांची फसवणुक केली.या गुन्ह्याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैरागकर हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *