Supriya Sule : बारामती मधील तीन हत्ती चौक ते न्यायालय दरम्यान सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न लोकसभेत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत खा.सुळेंची मागणी..!!


दिल्ली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरातील तीन हत्ती चौक ते न्यायालयादरम्यान सर्वीस रोड तयार करण्याबाबत रेल्वे खात्याकडून येणाऱ्या अडचणींचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. बारामती नगर परिषदेने याबाबत दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत खासदार सुळे यांनी हा मुद्दा मांडला. या रस्त्याचा काही भाग रेल्वे खात्याच्या अखत्यारीत येतो.रेल्वे खात्याने हा रस्ता बारामती नगरपरिषदेने लीजवर घ्यावा असे सुचविले आहे. परंतु यामुळे बारामती नगरपरिषदेवर मोठा आर्थिक ताण पडू शकतो. हा रस्ता लीजवर घेण्याऐवजी या रस्त्याचे बांधकाम व देखभाल दुरुस्तीचा खर्च आम्ही उचलू शकतो, असे बारामती नगरपरीषदेचे म्हणणे आहे.

ही बाब स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक विचार करावा, अशी मागणी केले. बारामती नगरपरीषदेने दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करावा,असे त्या म्हणाल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *