गेल्या सहा महिन्यांत ही दुसरी सर्वात मोठी कारवाई…
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर पोलीसांनी सरडेवाडी टोलनाका येथे कारवाई करत तब्बल २४० किलो गांजा पकडला आहे. विशाखापट्टनम येथून पुण्याकडे जाणाऱ्या हुंदाई कंपनीच्या केटा कारमध्ये गांजाव्यवासाया करीता घेऊन जाताना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रूपेश दिलीप जाधव ( रा.वृंदावन पार्क, कसबा,ता.बारामती ) व सुनिल तुळशीदास वेदपाठक (रा.वागज रोड,देवळे पार्क,बारामती ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये ७० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इंदापुर पोलिसांनी दोघांविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०(ब), २० (२) (क), २९ भादवि क ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत इंदापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका क्रेटा कारमध्ये गांजा घेऊन जात असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापुर पोलिसांच्या पोलीस पथकाने ०९ फेब्रुवारी रोजी रात्री ०८ वाजताच्या दरम्यान सरडेवाडी टोलनाका येथे सापळा लावला.यावेळी सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने एक हुंदाई कंपनीची क्रेटा कार नं.MH.42.A.5656 ही पोलीसांना संशयास्पद वाटल्याने पोलीसांनी त्या कारला थांबण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यात ते अपयशी ठरले.पोलीसांनी कारची पाहणी केली असता गाडीमध्ये गांजाची १२० पॅकेट्स मिळून आले.यामध्ये ६० लाख किमंतीचा २४० किलो ओलसर गांजा व १० लाखांची कार ताब्यात घेण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण आनंद भोईटे, बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक प्रकाश पवार,पोलीस नाईक सलमान खान,पोलीस हवालदार बालगुडे,पोलीस शिपाई लक्ष्मण सुर्यवंशी,दिनेश चोरमले,शिधाराम गुरव,विनोद काळे, गजानन वानोळे,विकास राखुंडे,विक्रम जमादार यांच्या पथकाने केलेली असुन पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे करीत आहेत.