पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
सासवड पोलिसांनी कोडीत गावामध्ये अवैधरित्या साठविण्यात आलेला देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी रिक्षा चालक उत्तम हरिभाउ राजिवडे,वय.५६ वर्षे ( रा.कोडीत “बु”,नंदी चैक,ता. पुरंदर,जि.पुणे ) याच्यावर सासवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा या अगोदरही असे कृत्य करत आला असून त्यावर यापुर्वी गुन्हे दाखल असून,या कारवाईत आरोपीकडून २ लाख १६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दि.०२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक घोलप याना गोपनीय बातमीमार्फत माहिती मिळाली की,कोडीत “बु” या गावातील नंदी चौकात उत्तम राजिवडे हा त्याचे ऑटो रिक्षामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यानी कोडीत गावात जात पाहणी केली असता,त्यांनी राजवाडे याच्या रिक्षाची
पाहणी केली असता,त्यामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्याने पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत,त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आनंद भाईटे,भोर पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप,पोलीस हवालदार रूपेश भगत, लियाकत अली मुजावर,गणेश पोटे,होमगार्ड विक्रम जगताप यांच्या पथकाने केलेली आहे.