चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेवर देखील गुन्हा दाखल…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सोमेश्वरनगर परिसरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेल्या ऋषी गायकवाड यांनी चंद्रकांत पाटलांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला ५१ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते अशी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केली होती.शाई फेकची घटना घडल्यानंतर देखील सोशल मीडियावरील त्या व्यक्तीच्या बारामतीत सत्कार करण्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला होता.यामुळे आता बारामतीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
त्यामुळे सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या ऋषिकेश गायकवाड व चंद्रकांत पाटलावर शाई फेक करणाऱ्या मनोज गरबुडे या दोघांविरोधात बारामती पोलिसांनी भा.द.वि कलम ३५३,१०९,१४३, १४९,५०४,५०६ ) नुसार १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी बारामती भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली.
सत्ता गेल्याने काही लोकांचा भ्रमनिरास झाला असून ते अस्वस्थ झाले आहेत त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावून त्यांना काहीजण बदनाम करीत आहेत. त्यामुळे इथून पुढील काळात भारतीय जनता पक्षांच्या नेत्या विषयी चुकीचे वक्तव्य व चुकीचे कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत असा ईशारा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा सचिव अविनाश मोटे,तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे तालुका उपाध्यक्ष जगदीश कोळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.