माळेगाव पोलीस कर्मचाऱ्यांवर होतोय गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडद येथील शेतकरी महादेव पानगे यांच्या चोरीस गेलेल्या गायींचा माळेगाव पोलिसांनी शोध लावत दोघांना ताब्यात घेतले आहे.शुभम चंद्रकांत झेंडे,वय.२८ वर्षे मुळ,रा.८८ चाळ, गुरसाळे,ता.माळशिरस, जि.सोलापूर ( सध्या रा.पिंपळी, ता.बारामती,जि.पुणे ), सौरभ रविंद्र डांभरे,( रा.शिर्सुफळ ता. बारामती,जि.पुणे ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत माळेगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की,मेडद गावातील शेतकरी महादेव पानगे यांच्या गायी चोरीस गेलेल्या होत्या.या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार विजय वाघमोडे,राहुल पांढरे आणि यांना मार्गदर्शन करून तपासाच्या अनुषंगाने दोन स्वतंत्र तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केलेली होती. या तपास पथकामधील पोलीस अंमलदार विजय वाघमोडे,राहुल पांढरे यांनी तांत्रिक तपासात चोरीस गेलेल्या गायींच्या वाहतूकीसाठी चारचाकी इंट्रा व्ही ३० गाडी क्र.MH.42 BF.1367 क्रमांकाचा टॅम्पो वापरण्यात आला असल्याची गोपनीय माहिती घेत दोघांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता,त्यांनी मेडद येथील गायी चोरल्याचे कबूल केले.तसेच याच आरोपींनी बांदलवाडी व पिंपळी या गावातून दोन गायी केल्याची कबुली दिल्याने,त्यांच्या ताब्यातील एका गायीसह ३ कालवडी असा एकूण ५,९५,००० किमतीचा मुददेमाल हस्तगत केलेला आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,पोलीस
उपअधीक्षक बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस निरीक्षक किरण अवचर,पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे,सहाय्यक फौजदार जयवंत ताकवणे,पोलीस नाईक राहुल पांढरे, विजय वाघमोडे,प्रवीण वायसे,ज्ञानेश्वर मोरे यांच्या पथकाने केलेली आहे.