बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नुकतीच वर्ल्ड फॉर नेचरच्या वतीने न्यु इंग्लिश स्कूल पांढरवस्ती,येथे “वन्यजीव संरक्षण व प्रबोधन” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.वन्यजीवांची निसर्गातील भूमिका किती महत्वाची आहे व ती अबाधित रहावी व निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
यावेळी वर्ल्ड फॉर नेचरच्या बारामती तालुका टिमची स्थापना करण्यात आली. प्रशांत नवले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वन्यजीव संरक्षक व निसर्गसेवक यांची टिम स्थापन करण्यात आली येणाऱ्या काळात वर्ल्ड फॉर नेचरची बारामती टिम संपूर्ण तालुक्यात व परिसरात वन्यजीव संवर्धन व निसर्ग संवर्धनाचे कार्य मोठ्या जोमाने करण्यासाठी सज्ज आहे.
या कार्यक्रमावेळी वर्ल्ड फॉर नेचरचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे बारामती तालुका संघटक प्रशांत नवले,वर्ल्ड फॉर नेचरचे रामानंद गावडे महेश शिंदे,संकेत महाडीक, नवनियुक्त वर्ल्ड फॉर नेचरची बारामती टिम सदस्य व शाळेचे सर्व अधिकारी,शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.