INDAPUR NEWS : जिल्हा नियोजनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी बावीस कोटींच्या कामांना मंजुरी – हर्षवर्धन पाटील


हर्षवर्धन पाटील यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये २२ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे व निधी मंजूर करण्यात आला आहे,अशी माहिती माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील यांनी दिली.

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, भाजप-बाळासाहेबांची शिवसेना गटाची महाराष्ट्र मध्ये सत्ता आल्यानंतर आपल्या इंदापूर तालुक्यासाठी विविध माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सातत्याने आपण निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज आपल्या इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये बावीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

पुढील काळातही भाजप व बाळासाहेबांची शिवसेना सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी व विकास कामे इंदापूर तालुक्याला मिळणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *