बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरामध्ये कॉलेज व महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले गाड्या फिरवताना निदर्शनास येत असतात.या मुलांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना पालक त्यांना गाड्या चालवण्यास देत असतात. त्यामुळे सदरच्या विद्यार्थ्यावर कारवाई करून उपयोग नाही त्यासाठी त्यांच्या पालकांवर कारवाई करावी ही कायद्यात तरतूद आहे. तरी गेल्या दोन दिवसांमध्ये बारामती शहर वाहतूक शाखेकडून अठरा मुलांच्या पालकांवर वाहतूक अधिनियम अन्वये खटले दाखल करून कोर्टात पाठवण्यात आलेले आहेत.
त्यांना कमीत कमी पाच हजार रुपये दंड होईल.याही पुढे त्यांच्यावर सतत कारवाई केली जाणार आहे.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक अनंत भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक बाळासो जाधव,चालक कांबळे तसेच वाहतूक शाखेकडील सर्व पुरुष व महिला कर्मचारी यांनी केलेली आहे.