BIG NEWS : बारामतीत राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रेमीकडून ‘जोडे मारो’ आंदोलन..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ बारामतीत शिवप्रेमींच्या वतीने राज्यपालांच्या फोटोला जोडे मारीत निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपाल यांना ताबडतोब महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवावे.राज्यपालांनी वारंवार वादग्रस्त विधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहेत. यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलीय.

यावेळी बोलताना बारामती नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने बेताल वक्तव्य करीत आहेत.त्यामुळे त्यांचा आज बारामतीमधील शिवप्रेमींच्या वतीने निषेध करतो.यापूर्वीही महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही असच बेताल वक्तव्य त्यांनी केलं होतं.हे वक्तव्य करीत असताना त्याच्या चेहऱ्यावर अजिबात गांभीर्य नव्हतं हसत हसत त्याने हे वक्तव्य केलं असल्याचे बल्लाळ यांनी बोलताना सांगितले.दोन दिवसांपूर्वी महाराजांबद्दल त्यांचे विचार हे जुने झालेले आहेत.असे बोलून शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सातत्याने बेताल वक्तव्य करणारे मनुवादी विचारसरणीचे कोशारी यांना मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ निलंबित करून त्यांची या महाराष्ट्रातून हाकलपट्टी करावी.अशी मागणी देखील बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी राज्यसरकारकडे केली.

भाजपचे खासदार त्रिवेदी यांनी सुद्धा तेच कात गिरवत त्यांनी देखील महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या खासदाराचा देखील शिवप्रेमींच्या वतीने जाहीर निषेध करतो. राज्यभर कोश्यारी यांचा निषेध होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे एक शब्द उच्चारत नाहीत.ज्या छत्रपतींनी बारा बलुतेदारांना व अठरापगड जातींना सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केले.. याचाच आदर्श घेऊन शिवाजी महाराजांचा अभ्यास बाहेरच्या देशात त्या महाराजांबद्दल राज्यपालांनी जे बेताल वक्तव्य केल्याने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी बारामती नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ,माजी नगरसेवक सत्यव्रत काळे,राकेश वाल्मिकी,उमेश दुबे व आदी शिवप्रेमी उपस्थितीत होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *