पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क…
खेड राजगुरुनगर या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, दोघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील तीन पिस्टल,सहा मॅकझीन सह ३० जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.आकाश आण्णा भोकसे,वय.२३ वर्षे ( रा. कुरकुंडी,ता.खेड,जि.पुणे ) महेश बाबाजी नलावडे, वय. २३ वर्षे ( रा.कुरकुंडी,ता.खेड,जि.पुणे ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.दोघांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट ३,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या अधिक माहितीनुसार, खेड राजगुरुनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना,(दि.२०) रोजी पेट्रोलिंग करत असलेला पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,दोघेजण बुलेट गाडीवरून शिरोली बाजू कडून किवळे गावाकडे जात असून त्यांचेकडे गावठी पिस्टल असल्याचे समजले.याबाबत खात्री करून घेण्यासाठी त्याठिकाणी जाऊन बुलेट गाडीवरील दोघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता आकाश याच्या कंबरेला दोन्ही बाजूस दोन लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले.तसेच त्याचे पॅन्टच्या खिशात २ मॅकझीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या.दुसऱ्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आला. व त्याचे पॅन्टच्या खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली. दोघांकडून तीन गावठी पिस्टल आणि तीन मॅकझीन प्रत्येकी पाच जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्टल मधे प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेली अवस्थेत मिळून आली.त्यांच्या ताब्यातील जवळपास १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संशयित आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी खेड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकअंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील यांच्या मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे गणेश जगदाळे, पोलीस हवालदार विक्रमसिंह तापकीर,विजय कांचन, पोलीस नाईक अमोल शेडगे,बाळासाहेब खडके,पोलीस
शिपाई धिरज जाधव,निलेश सुपेकर दगडू वीरकर यांच्या पथकाने केलेली आहे