BIG BREAKING : उजनीमध्ये हजारोंच्या संख्येने धनगर बांधव घेणार जलसमाधी ? धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर इंदापूरमध्ये भव्य मोर्चा ; हजारो धनगर बांधव मोर्चामध्ये एकवटले..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी इंदापूर मध्ये भव्य मोर्च्या काढण्यात आला आहे.या मोर्च्यात हजारो धनगर बांधव एकवटले आहेत, हा मोर्चा राजकारण विरहित असून धनगर ऐक्य परिषदे कडून मोर्चाचे आयोजन केले होते.धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढला गेला होता.हा मोर्चा इंदापुरातील बाह्य वळणावरून सुरू होऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून प्रशासकीय भवनासमोर ठाण मांडण्यात आले.या मोर्च्याचा दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून इंदापूर शहरातील चौका चौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी इंदापूर मध्ये गेल्या पंधरा दिवसात धनगर समाजाचे हे तिसरे मोठे आंदोलन आहे.

इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय भवनासमोर ठिय्या मांडण्यात आला.यावेळी मोर्चाचे आयोजक धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे म्हणाले की,१३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली या बैठकीमध्ये देशातल्या पाच राज्यातील घटनेमध्ये झालेल्या छोट्या चुका यामध्ये काना,मात्रा,वेलांटी,इंग्रजी स्पेलिंग मिस्टेक,हिंदी शब्द उच्चार या चुका दुरुस्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयामुळे त्या राज्यातील लोकांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ७५ वर्षापासून महाराष्ट्रातला धनगर समाज धनगड आणि धनगर यात धनगर शब्दामुळे आरक्षण आणि या समाजाचा प्रश्न धनगडची दुरुस्ती करून धनगर करावी.ही मागणी गेल्या ७० वर्षापासूनची आहे.

त्यामुळे राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करावी.यासाठी इंदापूर तालुक्यातून धनगर समाजाचा आंदोलन सुरू झालं.पाच राज्यातल्या पाच राज्यात दुरुस्ती होते तर मग महाराष्ट्रातल्या धनगराची का होत नाही ? असा सवाल देखील तरंगे यांनी उपस्थितीत केला. यावेळी आक्रमक होत तरंगे यांनी पाच तारखेपर्यंत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगड आणि धनगर ही शब्दरचना दुरुस्ती करण्याची शिफारस पाठवली नाही.तर उजनी धरणामध्ये पाच हजार धनगर बांधव जलसमाधी घेणार. यावर धनगर समाज ठाम आहे.. म्हणून राज्य सरकारने या गोष्टीवर तातडीने निर्णय घ्यावा.असा गर्भित इशारा देखील तरंगे यांनी राज्य सरकारला दिला. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *