बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
श्रद्धा वालकर या तरुणीचा अफताफ पुनवाला या युवकाने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात हिंदुत्ववादी संघटनांकडून कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी व महिलांनी एकत्र येऊन अफताफला फाशी द्या व श्रद्धाला न्याय द्या.”भारत माता की जय” फाशी दो फाशी दो, अफताफ को फाशी दो,श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे.अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या हा कॅन्डल मार्च शहरातील गुणवडी चौकातील हनुमान मंदिरापासून भिगवण चौकाकडे आणण्यात आला.यावेळी आफताफच्या प्रतिमेला जोडे मारत त्याच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
श्रद्धा वालकर खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला १३५ दिवसात फाशीची शिक्षा देण्यात यावी, देशात धर्मांतर बंदी कायदा करण्यात यावा,लव जिहाद सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी लव जिहादवर कायदे तयार करण्यात यावेत आणि देशातील महिलांच्या खुणांच्या घटनांचा तपास तात्काळ करून आरोपींना शिक्षा देण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना राबवाव्यात अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली.यावेळी शहर पोलिसांना देखील निवेदन देत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी हिंदुत्वादी संघटनांकडून करण्यात आली.