BIG BREAKING : आमदार नितेश राणेंचा दौंड पोलिसांना ४८ तासांचा अल्टिमेट; अन् अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक विनोद घुगेंची थेट नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला आणि तरुणावर प्राणघातक हल्लाच्या निषेधार्थ हिंदू जनआक्रोश ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.यामध्ये आमदार नितेश राणे सामील होते.यावेळी दौंड पोलीस स्टेशनवरती धडक मोर्चा
काढण्यात आला होता.आरोपीला ४८ तासात अटक करण्याचा नितेश राणे यांनी पोलिसांना अल्टिमेट दिला होता.आणि या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी काही तासांतच दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली.

दौंड मधील प्रकरणात घुगे यांनी हयगय केली असल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाल्याचे बोलले जात आहे.गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक न झाल्याने पोलीस निरीक्षकांच्या भूमितीची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार निलेश राणे यांनी केली होती.दौंड पोलीस स्टेशनचा तात्पुरता कार्यभार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना देण्यात आला आहे.पाटील यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि यवतमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे.दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा भाऊसाहेब पाटील यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये हजर होत कामकाजाची सूत्रे हातात घेतली आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *