BIG BREAKING : तब्बल २२ गंभीर गुन्हयातील कुख्यात आरोपी जेरबंद;पुणे ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मोक्का,खुन,दरोडा,जबरी चोरी सारख्या तब्बल २२ गंभीर गुन्हयातील फरार आरोपीच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे.लखन उर्फ महेश पोपट भोसले (रा.वडगाव,जयराम स्वामी,ता.खटाव,जि.सातारा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.लखन भोसले याच्यावर दहीवडी पोलिस ठाण्यात घरफोडी,जबरी चोरीचे तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत.याशिवाय म्हसवड पोलिस ठाण्यात दरोड्याचा एक व वडूज पोलिस ठाण्यात घरफोडीचा एक तर पुणे ग्रामीण मधील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात मोक्कासह दरोडा,घरफोडी,जबरी चोरी असे तीन,बारामती तालुका पोलिस ठाण्यात खूनासह जबरी चोरीचा एक,इंदापूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे.

याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मुका खून दरोडा जबरी चोरी यासारख्या तब्बल २२ गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी लखन भोसले हा घाडगेवाडीत आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी अभिजित एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना मिळाली होती. त्यानुसार पथके तयार करून त्याचा शोध सुरु करण्यात आला.मंगळवारी तो घाडगेवाडी येथील एका घरासमोर उभा होता. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जावू लागला.पोलिसांनी त्याला एक किमीपर्यंत पाठलाग करत ताब्यात घेतले.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा,वडगाव निंबाळकर व बारामती तालुका पोलिसांनी
संयुक्तपणे केलेली आहे.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,अशोक शेळके, वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे अमित सिद पाटील,अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे,मुकुंद कदम,रविराज कोकरे,बाळासाहेब कारंडे वडगावचे हिरालाल खोमणे ह्दयनाथ देवकर,दादा कुंभार व बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेली कारवाई केली.या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे नागरिकाकडून कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *