BIG NEWS : बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना ! ऊसतोडणी मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; पैसे नसतानाही डॉ.मुथा पिता पुत्रांनी ५५ टाके घालत केले मुलावर यशस्वी उपचार ..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रूक परिसरात ऊसतोडणीसाठी आलेल्या तोडणी कामगाराच्या मुलावर भटक्या कुंत्र्यांनी हल्ला केला असून, कुत्र्यांच्या हल्यात फाटलेल्या जबड्याला सुमारे ५५ टाके घालत त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.बारामती येथील श्रीपाल हॉस्पिटलच्या डॉ.राजेंद्र मुथा व डॉ.सौरभ मुथा या डॉक्टर पिता-पुत्रांनी या मुलावर यशस्वी उपचार उपचार केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊसतोडणीसाठी पाथर्डी तालुक्यातील ऊसतोडणी कामगार कोऱ्हाळे बुद्रूक येथे आले असून,सोमवारी सायंकाळी ऊसतोडणी कामगाराचा युवराज राठोड हा कोपीसमोर खेळत होता. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्याला अचानक घेरले आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवत युवराजच्या जबडयाला चावले. यात तो गंभीर जखमी झाला.याच अवस्थेत पालकांनी त्याला उपचारासाठी डॉ.राजेंद्र व डॉ. सौरभ मुथा यांच्याकडे आणले.परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले.

मात्र,राठोड कुटुंब गरीब असल्याने उपचारासाठी त्यावेळी पैसे नव्हते. गंभीर अवस्थेत असलेल्या मरणाच्या दारात असलेल्या बालकाला पाहुन मदत करण्याचा निर्णय घेतला.त्याला स्व:खचार्तून आवश्यक औषधे, इतर साहित्य आणले. मुलाचा जीव वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी रात्री उशीरा डॉ.राजेंद्र, डॉ सौरभ यांनी दंतरोगतज्ञ डॉ.आशुतोष आटोळे यांच्यासह युवराजवर शस्त्रक्रिया केली. त्याला जवळपास ५५ टाके घालत त्यावर यशस्वी उपचार केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *