सदगुरू बाळूमामांच्या नावाने आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या लुटारू मनोहर मामाच्या विरोधात आदमापूर ग्रामपंचायतीचा ठराव….


मनोहर ( मामा ) उर्फ भोसले यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी…

आदमापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

विश्वात ईश्वर एकच असतो,आहे पंढरीचा राणा विठ्ठल एक,शिर्डीचे साईबाबा एक,शेगावचे गजानन महाराज एक,दख्खन चा राजा जोतीबा एक,करवीर निवासिनी श्री.महालक्ष्मी एक,अशी महाराष्ट्राची कितीतरी आराध्य दैवते आहेत पण एकमेव द्वितीय त्यांचे सदगुण रूप एकच आहे.
तसेच देवावतारी शिव-शेषाचा अवतार घेऊन धनगर कुळात जन्म घेऊन आदमापूर मध्ये समाधिस्त होऊनही भक्तांना आपल्या मेंढ्यारुपी कळपात अजूनही अस्तित्वाचा पुरावा देणारे सदगुरू बाळूमामा एकच आहेत.अध्यात्म,ध्यान धारणा, भक्ती,श्रद्धा याही एकच आहेत मात्र काही अजाण अनादी काळापासून आपणच देव असलेचे भासवून मनोहर भोसले समाजाला व स्वतःला फसवत आहेत.अशाच प्रकारे अलीकडे आपणच बाळूमामांचे शिष्य, अवतार किंवा वंशज असलेचे सांगून मनोहर चंद्रकांत भोसले ( रा.उंदरगाव ता.करमाळा जि. सोलापूर हे बाळूमामा भक्तांची दिशाभूल करीत आहेत अलीकडे त्यांच्याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तसेच बाळूमामांचे नाव सांगून आपले आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. बाळूमामांची भक्ती,श्रध्दा,भजन,कीर्तने इतकेच नव्हे मंदिर होणे हे क्रमप्राप्त आहे मात्र अशा प्रकारे भक्तांची लुट करणे हे बाळूमामांच्या तत्वात बसत नाही त्यांनी आपल्या संपूर्ण अवतार काळात कोणाकडूनही एक दाम घेतला नाही त्यामुळे आम्ही ग्राम पंचायत आदमापूर या सभेद्वारे मनोहर चंद्रकांत भोसले (रा.उंदरगाव ता.करमाळा,जि. सोलापूर )यांचा धिक्कार व निषेध करत आहोत.मनोहर भोसले हे बाळूमामाच नामोहरम करतील यावर आमचा विश्वास आहे तसेच घेतलेल्या या सभेद्वारे सदगुरू बाळूमामा देवालय समिती यानाही सांगण्यात आले की, त्यांनीही त्यांच्या मासिक सभेत अशा भुरट्या व्क्तीच्या निषेधाचा ठराव करून अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.असा सर्वानुमते ठराव ठरला असून,याला प्रकाश बंडेराव खापरे,सुमन विजय गुरव यांनी या सभेला सूचक दिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *