BIG NEWS : दौंड -पाटस मार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू..!!


ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने अपघात झाल्याची लोकांमध्ये चर्चा…

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड पाटस मार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला .या अपघातात दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला आहे . मृत युवक हे काष्टी गावातील होते . या अपघातात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावावर शोककळा पसरली आहे . ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली ला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.गणेश बापू शिंदे,वय २५ वर्षे,ऋषिकेश महादेव मोरे,वय.२३ वर्षे ,स्वप्नील सतीश मनुचार्य,वय.२४ वर्षे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्ल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर दौंड शुगर कारखाना येथे पाटस दौंड रोड ने ऊस घेऊन जात होता. या ट्रक्टर च्या ट्रॉली ला दुचाकी ने मागून धडक दिली. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला. दुचाकी क्र.एम.१६ BP 9280 पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी वर असणारे युवक गणेश शिंदे,ऋषिकेश मोरे,स्वप्नील मनुचार्य या तिघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *