बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात प्रबळ पक्ष, पक्षाचे देशामध्ये सर्वाधिक खासदार, सर्वाधिक राज्यांमध्ये भाजपची सत्ता असे असताना बारामती लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचा खासदार नाही याचा कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे.बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सध्या हवा बदलत आहे. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या लोककल्याणकारी योजनांमुळे व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर २०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा खासदार हा भाजपचा असेल असा विश्वास केंद्रीय अन्न प्रक्रिया उदयोग राज्यमंत्री मा.प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला.
भिगवण येथील तारादेवी लॉन्स येथे आपण आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. प्रसंगी भाजपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार राम शिंदे,हर्षवर्धन पाटील,भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते,भाजपा कार्यालयीन मंत्री रघु चौधर व इतर मान्यवर उपस्थित होते.